Definition List

LightBlog
Viral Gawali

Wednesday, July 18, 2018

भुसावळ

🏙 भुसावळ 🏙

      महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण व महत्त्वाचे रेल्वे प्रस्थानक. लोकसंख्या 1,32,146 (1981). हे जळगावच्या पूर्वेस सुमारे 22 कि.मी. अंतरावर असून तापी नदीपासून दक्षिणेस सुमारे 2 कि.मी. अंतरावर वसले आहे. हे मध्य रेल्वेचे विभागीय केंद्र असून येथून मुंबई - नागपूर - कलकत्ता व मुंबई - इटारसी - दिल्ली हे रुंदमापी लोहमार्ग जातात.

      पश्चिम रेल्वेने हे सुरतेशी जोडले आहे. प्रारंभी हे छोटेसे रेल्वेस्थानक होते, पण त्याच्या मध्यवर्ती स्थानामुळे त्याचा झपाट्याने विकास झाला. शहरात रेल्वे कामगारांची संख्या मोठी आहे. येथे 62 व 210 मेवॉ. क्षमतेची औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे, तसेच रेल्वे कर्मशाळाही आहे. रेल्वे एंजिनांची दुरुस्ती, देखभाल ही कामेही येथे चालतात.

      येथील नगरपालिकेची स्थापना 1882 मध्ये झालेली असून पाणीपुरवठ्याच्या आणि जलनिःसारणाच्या सोयी नगरपालिकेने केलेल्या आहेत. तापी नदीतून शहरास नळांद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. येथे नगरपालिकेची चार आकर्षक उद्याने आहेत. एक सुसज्ज अग्निशामक पथकही आहे. तसेच रेल्वेचे एक अद्यायावत रुग्णालय, आयुवेर्दिक व इतर खाजगी दवाखाने, पशुचिकित्सालय यांची सोय आहे. येथे खाजगी कुष्ठसेवा मंडळही आहे.

      भुसावळ हे मुंबई - नागपूर या टप्प्यात मध्यवर्ती असल्याने येथे चित्रपट वितरकांच्या अनेक कचेऱ्या आहेत. या व्यवसायामुळेही यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ही व्यापारी पेठ असून तेल गिरण्या, कापूस दाबण्याच्या व सरकी काढण्याच्या गिरण्या आहेत. अभियांत्रिकी, युद्धसाहित्य, गुळाचा व्यापार, बांबूकाम, शाली तयार करणे इ. उद्योगही येथे चालतात. महाविद्यालयीन शिक्षणाच्या, धंदे - शिक्षणाच्या सोयी तसेच मुलींची एक स्वतंत्र शाळा आहे. शहरात एक सार्वजनिक वाचनालय आहे.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers