Definition List

LightBlog
Viral Gawali

Friday, August 3, 2018

राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त यांचा स्मृतिदिन

राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त यांचा स्मृतिदिन.
जन्म. ३ ऑगस्ट १८८६
खडकाव्याला एक नवी प्रतिष्ठा मिळवून देणारा हा कवी. काव्यातून जनजागृती करून राष्ट्रवादाचे स्फुल्लिंग चेतविणा-या मैथिलीशरण गुप्त यांना महात्मा गांधीजींनी राष्ट्रकवी म्हणून गौरविले होते. त्यांची कविता, भाषण किंवा उद्बोधासारखी होती. पूर्व आणि पश्चिम, प्राचीनता आणि आधुनिकता यांत समन्वय साधणारा हा कवी. पुराणे तिहापासून राष्ट्रीय जागरण-समाजसुधारापर्यंत त्यांच्या कवितेचा प्रवाह होता. आपल्या वाणीने आणि लेखणीने गुप्ता यांनी सामाजिक संघर्षाला, चळवळीला अधिक तीव्र केले. आपल्या कवितांतून राष्ट्रीयत्वाच्या, सांस्कृतिक परंपरेच्या जोपासनेला नवे परिणाम दिले. साकेत, यशोदरा, हे भारतीय संस्कृतीच्या उदात्ततेचा गौरव करणारे त्यांचे कवितासंग्रह. खडीबोलीद्वारे हिंदी काव्यामध्ये अभिव्यक्तीचे नवे प्रभावी माध्यम आणणा-या या कवीने बाजीप्रभू देशपांडे यांच्यावरही कविता लिहिली आहे. ३ ऑगस्ट हा त्यांचा जन्म दिवस 'कवि दिवस' म्हणून साजरा केला जातो. १९५३ साली भारत सरकार ने त्यांना पद्म विभूषण व १९५४ मध्ये साहित्य पद्म भूषण देऊन सम्मानित केले होते. मैथिलीशरण गुप्त यांचे १२ डिसेंबर १९६४ रोजी निधन झाले.
*संजीव वेलणकर पुणे.*

1 comment:

  1. As reported by Stanford Medical, It's in fact the ONLY reason women in this country get to live 10 years more and weigh on average 42 lbs lighter than us.

    (And by the way, it is not about genetics or some secret diet and really, EVERYTHING related to "how" they are eating.)

    BTW, What I said is "HOW", and not "WHAT"...

    Tap this link to find out if this brief quiz can help you release your real weight loss potential

    ReplyDelete

Translate

Search This Blog

Followers