नीरज

■ देव आनंद यांनी लखनऊतील एका मुशायऱ्यात एका कवीच्या कविता ऐकल्या आणि त्यांना मुंबईला येण्यास सांगितले.
कविता, ग्मज्मला आणि नज्म्म लिहिणे हाच त्यांचा श्वास
आणि ध्यास होता. त्यांचे नाव होते गोपालदास सक्सेना ऊर्फ
‘नीरज’. ■ नीरज यांचे ‘कारवाँ गुजर गया..’ हे गीत लोकप्रिय नंतर
झाले. त्याआधी याच नावाचा त्यांचा काव्यसंग्रह आला होता, जो
साठच्या दशकात युवा पिढीत तुफान लोकप्रिय होता. देव आनंदने नीरज यांना सचिनदांकडे
नेले. रंगीला या शब्दापासून सुरू होणारे गाणे त्यांना हवे होते. त्यातून नीरज
यांनी लिहिले रंगीला रे तेरे रंग में.. हे सदाबहार गाणे; जे
५० वर्षांनंतरही तसेच ताजे टवटवीत वाटते. पुढे मग ए भाय जरा देख के चलो,
बस यही अपराध मैं हर बार करता हूं, पैसे
की पहचान यहां, शोखियों में घोला जाए फूलों का शबाब, दिल
आज शायर है ग्मम आज नग्म्मा है, फूलों के रंग से, चूडम्ी
नहीं ये मेरा दिल है, लिखे जो खत तुझे, खिलते
हैं गुल यहाँ.. अशी अनेक गीते त्यांनी लिहिली. प्रेम पुजारी, मेरा
नाम जोकर, शर्मिली यांसारख्या चित्रपटांतील त्यांची गाणी
गाजली तरी हे चित्रपट मात्र तिकीटबारीवर आपटले. नीरज
यांची गाणी घेतली की चित्रपट पडतो, अशी ओरड तेव्हा काहींनी सुरू केली.
गीतलेखनाचे तीन मानाचे पुरस्कार मिळाले तरी त्यांना मग काम मिळणे बंदच झाले. देव
आनंदही त्यांना टाळू लागल्याने मग एके दिवशी सरळ बॅग भरून त्यांनी मुंबईला कायमचा
रामराम ठोकला आणि इटावा या आपल्या मूळ गावी पुन्हा गेले. जगण्यासाठी त्यांना अनेक
नोकऱ्या कराव्या लागल्या. ते सरकारी कार्यालयात टंकलेखक होते तसेच एका दुकानात
विक्रेता म्हणूनही त्यांना काम करावे लागले. शेवटी मेरठच्या एका महाविद्यालयात
हिंदीचे प्राध्यापक व नंतर विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले. दर्द
दिया है, आसावरी, मुक्तकी,
कारवां गुजर गया.. (सर्व काव्यसंग्रह), लिख
लिख भेजत पाती (पत्रलेखन), पंत-कला, काव्य
और दर्शन (समीक्षा) ही त्यांची ग्रंथसंपदा. पद्मश्री (१९९१) आणि पद्मभूषण (२००७)
किताबाने सरकारने त्यांना गौरविले होते. ■ ‘बदन के जिसके शराफत का पैरहन देखा, वो आदमी भी यहाँ हमने बदचलन देखा’ वा
‘जब लगा कक्षाएं न लेने का आरोप’ सारखी ग़जम्ल असो वा ‘मानव होना भाग्य है, कवि
होना सौभाग्य है’सारखा दोहा सादर करताना कविसंमेलनात त्यांचाच प्रभाव असायचा.
त्यांच्या कवितांमध्ये जीवनविषयक तत्त्वज्ञानाबरोबरच प्रगल्भतेची किनार होती. ‘आज
भले कुछ भी कह लो तुम, पर कल विश्व कहेगा सारा, नीरज
से पहले गीतों में सबकुछ था पर प्यार नहीं था’ असे आत्मविश्वासाने लिहिणारा कवी
हिंदीत तरी सापडणारही नाही.हरिवंशराय बच्चन, ओशो
हे त्यांच्या कवितांचे चाहते होते. ओशो यांनी अखेरच्या काळात त्यांना बोलावून
त्यांच्याशी दीर्घकाळ संवाद साधला होता. ९३
वर्षांचे दीर्घ आयुष्य त्यांना मिळाले. गुरुवारी प्रेमाचा हा प्रवासी अनंतात विलीन
झाला.
No comments:
Post a Comment