सँडफोर्ड फ्लेमिंग
जागतिक प्रमाणवेळ संशोधन
स्मृतिदिन - २२ जुलै १९१५
सँडफोर्ड फ्लेमिंग हे स्काॅटिश कॅनेडियन अभियंता आणि संशोधक होते. तसेच कॅनडाच्या राॅयल सोसायटीचे फाऊंडर मेंबर आणि टोरांटोमधील सायन्स आॅर्गनायझेशनच्या कॅनडियन इन्स्टिट्युटचे फाउंडर होते.
प्रमाणवेळ ही जगातील वेगवेगळ्या स्थानांमध्ये पाळली जाणारी घड्याळाची एक वेळ आहे. बऱ्याचदा प्रमाणवेळेला "स्थानिक वेळ" असेही संबोधले जाते. प्रमाणवेळ ही यूटीसीपासून स्थानिक वेळफरकामध्ये लिहीली जाते, उदाहरणार्थ भारतीय प्रमाणवेळ= यूटीसी+०५.३०, अमेरिकेची पूर्व प्रमाणवेळ= यूटीसी - ५:०० तर जपानची प्रमाणवेळ= यूटीसी + ९:००.
जगातील काही देशांमध्ये स्थानिक वेळेसोबत उन्हाळी प्रमाणवेळ (डेलाईट सेव्हिंग टाईम) वापरण्याची पद्धत प्रचलित आहे. ह्यानुसार उन्हाळी ऋतूमध्ये जास्त वेळ टिकणाऱ्या सूर्यप्रकाशाचा फायदा घेण्यासाठी सर्व स्थानिक घड्याळे १ तास पुढे ढकलली जातात.
No comments:
Post a Comment