Definition List

LightBlog
Viral Gawali

Friday, July 27, 2018

पंडित सदाशिव पवार

प्रख्यात तबलावादक पंडित सदाशिव पवार यांची जयंती.
जन्म. २८ जुलै १९३४
पं. सदाशिव पवार यांचे साता-यामधील मापरवाडी हे मूळगाव होते.  वयाच्या ११ व्या वर्षी त्यांना तबला वादनाची आवड निर्माण झाली. त्यामुळे ते मुंबईत आले. प्रारंभीचे तबला वादनाचे शिक्षण पं. चतुर्भुज राठोड यांच्याकडे आणि पुढचे शिक्षण फारूखाबाद घराण्याचे खलिफा उस्ताद आमीर हुसेन खॉँ यांच्याकडे घेतले.
तब्बल पन्नासहून अधिक वर्षं पं.पवारांनी उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ साहेबांना साथसंगत केली. बारा तासांचा रोजचा रियाझ, आणि आपल्या स्वतंत्र वादनशैलीमुळे ते लोकप्रिय तर झालेच, परंतु गेल्या साठ-पासष्ट वर्षातील तमाम गायकांना साथ दिली.
पं. सदाशिव पवारांनी डोंबिवलीत १९८३ साली सदाशिव अॅकॅडेमी ऑफ म्युझिकची स्थापना केली आणि जागतिक कीर्तीच्या गायक-वादकांचे कार्यक्रम डोंबिवलीकर रसिकांपुढे सादर केले.
देशभरातील बहुतांश सुविख्यात शहरांमध्ये त्यांचे साथसंगतीचे आणि एकल वादनाचे कार्यक्रम झाले. याबरोबरच भारताबाहेर अमेरिका, कॅनडा, मॉरिशस, अफगाणिस्थान, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आदी अनेक देशांमध्येही त्यांनी कार्यक्रम सादर केले.
पं. सदाशिव पवारांना डोंबिवली भूषण पुरस्कार, चतुरंग सन्मान, हलीन अॅकॅडेमी ऑफ सितारचा शरावती पुरस्कार, स्वरांकुर सन्मान, शारदा संगीत संस्थेचा सन्मान, आणि पं. राम मराठे  स्मृति पुरस्काराने गौरवण्यात आले होते. पंडित सदाशिव पवार यांचे
७ सप्टेंबर २०१७ रोजी निधन झाले.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers