वा. गो. मायदेव |
आज कविवर्य वासुदेव गोविंद ऊर्फ वा. गो. मायदेव
यांची जयंती.*
जन्म. २६ जुलै १८९४
कवी मायदेव म्हटले की,
कवितांची आवड असणाऱ्या जु्न्या पिढीतील वाचकांना
हटकून आठवणार ती त्यांची 'गाइ
घरा आल्या' ही
सुंदर कविता. सकाळी चरायला गेलेल्या गाई संध्याकाळी घरी आल्या तरी गाई राखायला
गेलेला 'वनमाळी' मात्र काही घरी आलेला नसतो.
कातरवेळ उलटते, रात्रही
होते, तरी
वनमाळी न आल्यामुळे आईच्या जिवाची जी उलघाल होते,
तिचे वर्णन मायदेव यांनी या कवितेत अतिशय
साध्या-सोप्या शब्दांत केले आहे. ही कविता हीच मायदेव यांची ओळख होती. १९२९ साली
त्यांनी ती लिहिली. १९१५ ते १९२९ या कालखंडात त्यांच्या हातून ज्या कविता लिहून
झाल्या, त्या
सर्व कविता 'भावतरंग' या संग्रहात वाचायला मिळतात. 'गाइ घरा आल्या' ही कविता याच संग्रहात आहे.
कवी मायदेव रविकिरण मंडळातील कवींचे म्हणजे, माधवराव पटवर्धन ऊर्फ माधव
ज्यूलियन, यशवंत, गिरीश, श्री. बा. रानडे आदींचे समकालीन
कवी. गंभीर विचारवृत्तीच्या; तसेच बालांसाठीच्या विपुल कविता
मायदेव यांनी लिहिल्या. त्या काळी लहान मुलांमध्ये मायदेव यांच्या बालकविता विशेष
आवडीच्या असत. कवी वनमाळी या टोपणनावानेही ते साहित्यक्षेत्रात परिचित होते.
'काव्यमकरंद', 'भावतरंग', 'भावनिर्झर', 'सुधा', 'भावविहार' हे त्यांचे काव्यसंग्रह; तर 'बालविहार', 'किलबिल', 'शिशुगीत', 'क्रीडागीत' हे बालगीत संग्रह प्रसिद्ध आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भा. रा. तांबे यांच्या कवितांचेही संपादन मा.मायदेव
यांनी केले होते. *मा.मायदेव* यांचे ३० मार्च १९६९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा
तर्फे *मा.मायदेव* यांना आदरांजली
*संजीव
वेलणकर पुणे*
No comments:
Post a Comment