Definition List

LightBlog
Viral Gawali

Wednesday, July 25, 2018

खग्रास चंद्र ग्रहण महिती

🌔🌖🌓🌘🌑खग्रास चंद्र ग्रहण महिती


          चंद्र ग्रहण
२७ जुलै २०१८ शुक्रवार रोजी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र ग्रहण लागेल.चंद्र ग्रहणाची  पूर्ण अवधि ३ तास ५४ मिनिटे आहे.
या ग्रहणाचा कालावधी २७ जुलै
रात्री ११वाजून ५४ मिनटा पासून सुरु होऊन २८जुलै रात्री ०३ वाजून ४९मिनटा पर्यत चंद्र ग्रहण काळाचे सुतक काळ असेल.
हे चंद्रग्रहण भारत,आस्ट्रेलिया, एशिया, अफ्रीका, यूरोप आणि अंटार्टिका मध्येही असेल.

सूतक म्हणजे
  ग्रहणकाळात सुतक हिंदू धर्मात  विशेष महत्त्व आहे.अमावस्येला सूर्य ग्रहण आणि पूर्णिमेला चंद्र ग्रहण होत असते.धार्मिक मान्यतेनुसार सूर्य किंवा चंद्र ग्रहण दिसत असल्यास सुतक पाळावे,जर ग्रहण दिसत नसेल तर पाळू नये.
सुतक म्हणजे वाईट दुषित काळ या काळात पृथ्वी अती संवेदनशील होते.तसेच मनुष्यही संवेदनशील होतो.कारण जे ब्रम्हांडी ते पिंडीं
यामुळे अतःघटना दुर्घटना होऊ शकते.म्हणून या काळात सावध राहावे.आणि परमेश्वराचीसेवा,ध्यान,
नामस्मरण करावे.या सुतकात काय करावे काय करु नये ते सांगितले आहे.
सूर्य ग्रहणात सूतकाचा प्रभाव १२तास अगोदर व चंद्र ग्रहणात सूतकाचा प्रभाव ९तास अगोदर सुरु होतो.
लहान मुले, वृद्ध व गर्भवतीस्त्रियांनी ते पासून पाळावेत ही विनंती का आहे.गर्भवती महिलानी ग्रहण पाहू नये.
वेधातील आणि ग्रहण काळातील
नियम:-भोजन करू नये, ग्रहण स्पर्श ते मोक्ष  काळात मल- मूत्र विसर्जन,भोजन, अभ्यंगस्नान,झोप, कामविषयक सेवन शक्यतो टाळावे.
नदीत स्नान शुभ मानले जाते. यथा
शक्ती स्नान कुठच्याही नदीत गंगा
समजून करावी.मोक्षा नंतर च स्नान करावे.
ग्रहण कालावधीत काय करावे?
 स्नान,दान,होम,तर्पण,श्राद्ध,मंत्र पुर्शचरण करावे .,ग्रहण लागण्याच्या सुरूवातीलाच दर्भ व तुलसीपत्र वापरले तर दोष लागणार नाहीत.
ग्रहणाबाबतीत बरेच गैरसमजुती आहेत.ग्रहण लागताच वेध लागते.त्यामुळे काहीच करु नये. हे खरेही आहे म्हणून काय करावे काय करु नये हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो.
१) ग्रहणात स्नान करुन पुजा,पाठ करावेत,मंत्र जप करावा.
२)ग्रहण काळात झोपू नये
३)घराची साफ सफाई करू नये.
४) गर्भवती स्त्रियांनी  देवाची उपासना करावी.जप करावा.घरातून बाहेर जाऊ नये.व ग्रहण काळी काहीही खाऊ नये.नाहीतर बाळाला शारीरिक त्रास होतो.
 ५) ग्रहण संपल्यानंतर घरात गंगाजल शिंपडावे त्यानंतर काहीतरी गोड बनवून देवाला नैवेद्य दाखवावा व नंतर जेवण करावे.
६)ग्रहणकाळात कोणाशीही भांडण करु नका.शांत रहा,ध्यान करा,गप्प बसा
७) ग्रहणकाळात झोपू नका नाहीतर रोग पकडतो.
८) ग्रहणकाळात लघुशंका, लघवी करु नये,घरात दरिद्रता येते.सावध रहा.
९) ग्रहणकाळात जो शौचास जातो त्यास पोटाचे विकार होतात.
१०) ग्रहणकाळात संभोग करु नये.नाहीतर डुक्कराच्या योनीत जन्म येतो.
११) ग्रहणकाळात चोरी, फसवणे,करु नका नाहीतर सर्पयोनीत जन्म घ्यावा लागेल.
१२) ग्रहणकाळात जीवजंतू व कोणाची हत्या करु नका.नाहीतर अनेक योनींत भटकावे लागेल.
१३) ग्रहणकाळात भोजन,माॅलीश करु नका,नाहीतर अनेक रोग शरीराला जखडतील.
१४) ग्रहणकाळात मौन पाळा,जप करा,ध्यान करा.याचे फल लाख पटीने आहे.
१५) ग्रहणकाळात सर्व कामे सोडून मौन व जप करा हे फार महत्त्वाचे आहे.
१६)सत्य ग्रहणशक्ती अगोदर खावून-पिऊन घ्यावे पण बाथरूम ला जावे लागेल असे घेऊ नये.
१७) नशापाणी,घाणेरडे वागणे करु नये.स्वैयपाक करु नये.धुने धुवू नये.पाणी भरु नये,
१८) भगवान  ग्रहणकाळात भ्रूमध्यामध्ये ध्यान करावे.मुले बुद्धिमान होतात.
ग्रहणकाळात काय करावे काय करु नये ही माहिती मी दिली आहे.ही लक्षात ठेवा.हे सर्व शास्त्र परिहार आहे.यातून कोणतीही सूट नाही.
..अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
  आयूर्वेदाचार्य
      नाथपंथी महेशनाथजी महाराज

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers