आज बहुप्रसव लेखक राजा राजवाडे यांची
पुण्यतिथी.
जन्म १ जाने. १९३६ देवरूख जवळच्या निवे बुद्रुक
येथे.
राजा राजवाडे यांच्या वडीलाचं देवरूखला हॉटेल
होतं. व पूर्वापार चालत आलेली निवे गावात शेती होती. हा एक कौटुंबिक पार्श्वभूमीचा
भाग आहे. बाबांचं मॅट्रिकपर्यंतच शिक्षण, देवरूखच्या‘न्यू इंग्लिश स्कूलमधून
झाल्यानंतर, राजा राजवाडे पुढील शिक्षणासाठी मुंबईल आले.
राजा राजवाडे यांचे शिक्षणमुंबईतील खालसा कॉलेज मधून अर्थशास्त्र व
राज्यशास्त्र हे विषय घेऊन बी.ए झाले. त्यावेळी नोक-यांचा सुकाळ होता. राजा
राजवाडे यांनी‘एम्प्लॉयमेंट
एक्स्चेंजमध्ये नाव नोंदवलं. तिथून त्यांना मुंबई महानगरपालिकेत नोकरी मिळाली.
तोपर्यंत ते गिरगावात राहायला आले होते. १९६५ च्या सुमारास राजा राजवाडे यांनी लेखन सुरू केले. १९६२ साली‘ स्त्री’
मासिकात ‘उन्हातलं घर’ ही कथा पहिल्यांदा आली. ते गिरगावात राहात असल्याने,
मुंबईतलं साहित्यिक क्षेत्र जवळपासचं. तिथून साहित्य संघ, मौजचं
ऑफिस, मॅजेस्टिकचं ऑफिस सर्व जवळपास. त्यामुळे अनेक
नावाजलेल्या लेखक-कवींची पायधूळ त्यांच्या गिरगावच्या घराला लागलेली. या
साहित्यिकांमध्ये ठळकपणे आरती प्रभू, वसंत सावंत, केशव
मेश्राम, श्रीपाद भागवत, मधु
मंगेश कर्णिक, नारायण सुर्वे अश्या अनेक साहित्यिक येथ असत.
राजा राजवाडे यांचि पहिली कादंबरी
चांदण्यातलं ऊन. जवळपास १३ वर्षे महानगरपालिकेत नोकरी केल्यानंतर, त्यांच्या
कामातला प्रामाणिकपणा, चिकाटी, उत्साह
पाहून त्यांचे स्नेही वैद्य यांनी ‘सिडको’ या गृहनिर्माण संस्थेसाठी नोकरी
करण्याचा आग्रह धरला. त्यावेळी म्हणजे १९७३ला ते ‘डेव्हलपमेंट ऑफिसर’ म्हणून
सिडकोत रुजू झाले. त्यावेळी त्यांचं ऑफिस नरिमन पॉइंट, निर्मल
भवन येथे होते. वास्तविक पाहता सिडको ही गृहनिर्माण संस्था होती. आपल्या अधिकाराचा
वापर करून, त्यांना एखादा मोठा फ्लॅट मिळवता आला असता,
पण आयुष्यात जवळपास १९८६ पर्यंत ते गिरगावात त्या जुन्या खोलीत राहत
होते. एकतर त्यांना गिरगावातील साहित्य संस्कृती मनापासून आवडत होती.
१९८०च्या सुमारास, त्यांचा
पहिला काव्यसंग्रह ‘सायाची पाने’ हा प्रसिद्ध झाला. त्याचे प्रकाशक होते त्यांचे
मित्र वामन देशपांडे. राजा राजवाडे हे खूप
भावुक होते. म्हणूनच ‘सायाची पाने’ या शीर्षकाची कविता त्याचं भावविश्व उलगडून
दाखवते.गरगरत पडतात सायाची पानेकोरीत वर्तृळे दाटलेल्या धुक्यावरतसेच आहेत हे आलेख कोरलेलेस्मृतीने एखाद्या व्याकूळ मनावरयाच कवितासंग्रहात ‘उन्मादक अभंग’ आहेत. राजा
राजवाडे यांनी जवळपास शंभर असे अभंग
लिहिले. त्यातील काही अभंग सायाची पाने
यात आहेत.
उदाहरण द्यायचे तर..तुझ्या अंगातलागाभुळला ऋतूजातो आहे ऊतूअंगोपांगीसुचतात मलाकोयलाची गाणीतुझी न्हाणी-धुणीपाहताना..वास्तविक राजा राजवाडे हे विचाराने संपूर्णपणे कम्युनिस्ट होते. तरुण
भारत’मध्ये तर संपूर्ण एक वर्ष म्हणजे तीनशे पासष्ट दिवस राजा राजवाडे यांनी‘उतरती उन्ह’ हे सदर चालवलं. तसेच ‘ललित’मध्ये
‘उदंड झाली अक्षरे’, ‘सोबत’मध्ये ‘सप्तरंग’ त्याचप्रमाणे मार्मिक,
धर्मभास्कर, नवशक्ती, रत्नागिरी
टाइम्स यांसारख्या अनेक वृत्तपत्रांत, मासिकांत त्यांनी सदर लेखन केलं.
त्याचं कथालेखन हे रोजच्या दैनिक घटनांवर
आधारित त्यांच्या कथा असायचे म्हणजे रस्त्यावर झोपणा-या माणसांपासून ते कोकणातल्या
घरापर्यंत त्याचं लेखन सर्वत्र भ्रमण करायचं. अगदी उल्लेखण्याजोग्या कादंब-या
म्हणजे धुमसणारं शहर (१९७५), कार्यकर्ती (१९७९), अस्पृश्य
सूर्य (१९७८), दुबई-दुबई (१९८०) ह्या आहेत.राजा राजवाडे
यांचा त्यांच्या मित्रावर खूप लोभ. म्हणूनच त्यांच्या ‘दोस्ताना’ या
व्यक्तिचित्रण संग्रहा…
No comments:
Post a Comment