संगीतकार व मेंडोलीन वादक मा.सज्जाद हुसेन
यांची पुण्यतिथी.
जन्म. १५ जून
१९१७.
मा.सज्जाद हुसेन यांना बालपणापासून संगीताची
आवड होती. त्यांनी लहान वयातच सतार, व्हायोलीन, वीणा,
बासरी, पियानो सारख्या वाद्ये शिकून घेतली. मेंडोलीन
हे त्यांचे अतिशय आवडते वाद्य होते. मा.सज्जाद हुसेन हे चित्रपटसंगीताचे बेताज
बादशाह होते. सज्जाद हुसेन यांच्या रचलेल्या चाली ऐकायला खूप सोप्या असत. पण
त्यांची नक्कल करायचा जेव्हा प्रयत्न होई तेव्हा त्या संगीतकाराला त्या सोप्या
चालीमागची अवघड वाट दिसायची आणि त्यांची तारांबळ उडत असे. त्यातच सज्जाद हुसेन
यांना गाण्याची एक ही मात्रा कमी जास्त झालेली चालत नसे. तशी झाल्याबद्दल त्यांनी
प्रसंगी लताबाई तर कधी नूरजहाँ यांना सुध्दा सुनावले होते. त्यांच्या या
स्वभावामुळेच त्यांना अतिशय कमी चित्रपटांचे संगीत द्यायचे काम मिळाले. सज्जाद
हुसेन यांनी आपल्या संगीतात मेंडोलीनचा सढळ वापर केलेला आढळून येतो. १९६३ च्या
“रुस्तम सोहराब” या चित्रपटानंतर त्यांना अनेक वर्षे वाट पहावी लागली. त्या काळात
त्यांनी आपल्या बाणेदार स्वभावानुसार कुणाकडे काम मागण्याऐवजी आपल्या मेंडोलीनवर
अनेक प्रयोग करणे पसंत केले. सज्जाद हुसेन यांनी आपल्या ३४ वर्षांच्या प्रदीर्घ
कारकिर्दीत फक्त १७ चित्रपट केले.
No comments:
Post a Comment