Definition List

LightBlog
Viral Gawali

Friday, July 27, 2018

शाहीर पिराजी रामजी सरनाईक

 प्रसिध्द शाहीर पिराजी रामजी सरनाईक यांचा स्मृतिदिन
जन्म. २८ जुलै
शाहीर तिलक, शाहीर विशारद आणि करवीर दरबारचे शाहीर व  ‘लहरी हैदर गुरूजी माझे शीघ्र कवी थोर! त्यांच्या कृपेने शाहीर पिराजी पोवाडा लिहिणार!’असे म्हणणा-या पिराजी रामजी सरनाईक या शाहिराने आपल्या खडय़ा आवाजात अनेक चित्रपटांतून, नाटकांतून, वीररसाने ओथंबलेले पोवाडे म्हटले आणि पिचलेल्या मनगटातही जान आणली, छातीत स्फुरण आणले. कोल्हापुरात शिवाजी पेठेत ‘उभा मारूती चौकात’ सन १९३३ मध्ये त्यांनी पहिला पोवाडा म्हटला तो बाजीप्रभूंचा! ‘सावकारी पाश या चिटपटातील पोवाडय़ाने त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. मुंबईच्या हिज मास्टर्स व्हाईस कंपनीने १९३७ मध्ये मुंबईची कहाणी हे त्यांचे पहिले ग्रामोफोन रेकॉर्डिग केले. पोलीस कचेरीतील कारकुनाची नोकरी सन १९५० मध्ये सोडून देऊन पिराजीरावांनी पूर्ण वेळ शाहिरीला वाहून घेतले. छ. शहाजी महाराजांनी त्यांना ‘शाहीर विशारद’ हा किताब व तहहयात मानधन दिले. महाराष्ट्र शाहिरी संमेलनाने त्यांना ‘शाहीर तिलक’ म्हणून गौरवले. ‘म्यानातून तलवार उपसावी’ असा शाहिरांचा आवाज बाहेर पडतो’ अशा शब्दांत शिवभक्त भालजींनी ज्यांना गौरव केला, असे हे शाहीर पिराजीराव! ज्यांच्या शंभरावर पोवाडय़ांच्या रेकॉर्डस प्रसारित झाल्या, असा हा करवीर शाहीर. ‘जुनं ते सोनं’ हा त्यांच्या गाजलेल्या पोवडय़ांचा संग्रह आहे.  शाहीर पिराजी रामजी सरनाईक यांचे ३० डिसेंबर १९९२ रोजी निधन झाले.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers