लोकमान्य टिळक यांची आज जयंती
● टोपणनाव : लोकमान्य टिळक
● जन्म : 23 जुलै, 1856 रत्नागिरी (टिळक आळी), महाराष्ट्र,
● मृत्यू : 01 ऑगस्ट 1920 पुणे, महाराष्ट्र, भारत
● चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा
● पत्रकारिता/ लेखन : केसरी, मराठा
● वडील : गंगाधर रामचंद्र टिळक
● आई : पार्वतीबाई टिळक
● पत्नी नाव : तापीबाई
● तळटिपा : "स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच "
◆ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ◆
हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, गणितज्ञ, खगोलतज्ज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी होते. लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.
टिळकांचे खरे नाव केशव आहे. परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सुर्याचे पिल्लू’ म्हणायचे. लोकमान्य टिळक यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. त्यांचे मूळ नाव केशव असे होते. पण, ‘बाळ’ हे टोपण नावच कायम राहिले. त्यांचे वडील गंगाधर पंत हे सुरूवातीला प्राथमिक शिक्षक होते. पुढे ते शिक्षण - निरीक्षक बनले. टिळक 10 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांची पुणे येथे बदली झाली. त्यामुळे टिळकांचे शिक्षण पुणे येथे झाले.
सन 1872 मध्ये टिळक मॅट्रीकची परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला. याच कॉलेजातून ते 1877 मध्ये बी.ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाले. पुढे सन 1879 मध्ये ते एल.एल.बी. च्या वर्गात असतानाच त्यांचा आगरकरांशी परिचय झाला. समान ध्येयाने प्रेरित झालेल्या या दोन तरुणांनी ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून आपल्या मातृभूमीची सुटका करण्यासाठी लोकजागृतीच्या आणि राष्ट्रोद्धाराच्या कार्यात स्वतःला वाहुन घेण्याचा निश्चय केला.
📙 साहित्य आणि संशोधन
टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यांच्यामधील मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते. त्यांची दोन पुस्तके ’ओरायन’(Orion) आणि ’आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ (Arctic Home Of Vedas) त्यांच्या अत्यंत क्लिष्ट विषय अभिनव व नावीन्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत. आर्क्टिक हे आर्यांचे मूळ वस्तीस्थान आहे असा निष्कर्ष यामध्ये त्यांनी मांडला आहे. त्यांचे तिसरे पुस्तक ’गीतारहस्य’ यात त्यांनी भगवद्गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🙏 सौजन्य 🙏
® सतिश बोरखडे ®
No comments:
Post a Comment