*उमाजी नाईक*
उमाजी
नाईक हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे
महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक. होते. नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म
रामोशी-बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर
१७९१रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला. उमाजीचे कुटुंब पुरंदर
किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळेच त्यांना नाईक
ही पदवी मिळाली होती. उमाजी जन्मापासूनच हुशार, चंचल, शरीराने धडधाकट,
उंचापुरा आणि करारी होता. त्याने पारंपरिक रामोशी हेर कलालवकरच आत्मसात
केली. जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने वडील दादोजी नाईक यांच्याकडून
दांडपट्टा, तलवार, भाला, कुऱ्हाडी, तीरकमठा, गोफण वगैरे चालवण्याची कला
अवगत केली. या काळात इंग्रजांनी हिंदुस्तानात आपली सत्ता स्थापन करण्यास
सुरुवात केली होती. हळूहळू मराठी मुलुख जिंकत त्यांनी पुणे ताब्यात घेतले.
इ.स. १८०३मध्ये पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यासस्थानापन्न केले आणि
त्याने इंग्रजांचा पाल्य म्हणून काम सुरु केले. सर्वप्रथम त्याने इतर सर्व
किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून
काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले.त्यामुळे रामोशी समाजावर
उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजी अत्याचार वाढू लागले. अशा परिस्थितीत
करारी उमाजी बेभान झाला. छत्रपती शिवरायांना श्रद्धास्फूर्तीचे स्थान देत
त्याने त्यांचा आदर्श घेऊन स्वतःच्या अधिपत्याखाली स्वराज्याचा पुकार करत
माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठुजी नाईक,
कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोल्स्कर यांना बरोबर घेऊन कुलदैवत
जेजुरीच्या श्री खंडोबारायाला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात
पहिल्या बंडाची गर्जना केली.
*संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ*
No comments:
Post a Comment