शायर शकील अहमद उर्फ मा.शकील बदायूँनी यांची जयंती.*
जन्म. ३ ऑगस्ट १९१६

शकील बदायूँनी यांनी हेमंत कुमार यांच्या सोबत
बेकरार कर के हमें यूं न जाइये.., कहीं दीप जले कहीं दिल.. जरा नजरों से कह
दो जी.. निशाना चूक ना जाये, भंवरा बड़ा नादान है बगियन का मेहमान है, ना
जाओ सइयां छुड़ा के बहियां, जब जाग उठे अरमान तो कैसे नींद आये.. अशी
अप्रतींम गाणी दिली.
निर्माता-निर्देशक ए.आर.कारदार
यांच्या चित्रपटात शकील बदायूँनी यांनी गाणी लिहिली होती. १९४७ मधील
चित्रपट दर्द मधील गाणी शकील बदायूँनी यांनी लिहिली होती की जी सुपरहिट
झाली होती. त्या नंतर या दोघांनी दुलारी, दिल्लगी, दास्तान, जादू, दीवाना,
दिले नादान, दिल दिया दर्द लिया अशा चित्रपटासाठी एकत्र काम केले. शकील
बदायूँनी यांनी गुरुदत्त, महबूब खान, के आसिफ, राज खोसला, नितिन बोस
यांच्या चित्रपटासाठी गाणी लिहिली होती.
दिलीप कुमार
यांच्या मेला, बाबुल, दीदार, आन, अमर, उड़न खटोला, कोहिनूर, मुग़ले आज़म,
गंगा जमुना, लीडर, दिल दिया दर्द लिया, राम और श्याम, संघर्ष व आदमी या
चित्रपटांची गाणी शकील बदायूँनी यांची होती.
शकील
यांचा चित्रपटसृष्टीतील एक विक्रम आजही तसाच आहे. तो म्हणजे १९६१ ते ६३ सलग
तीन वर्षे फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला होता. १९६० मध्ये चौदहवी का
चांद या चित्रपटातील चौदहवीं का चांद हो या आफताब हो..१९६१ मध्ये 'घराना'
या चित्रपटातील हुस्न वाले तेरा जवाब नहीं, व १९६२ मध्ये 'बीस साल बाद' या
चित्रपटातील कहीं दीप जले कहीं दिल या गांण्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार
मिळाले होते. *मा. शकील बदायूँनी*यांचे २० एप्रिल १९७० रोजी निधन झाले.
आपल्या समुहा तर्फे *मा.शकील बदायूँनी* यांना आदरांजली.
*संजीव वेलणकर पुणे.*
No comments:
Post a Comment