Definition List

LightBlog
Viral Gawali

Wednesday, July 25, 2018

विशेष माहिती दि. 25/07/2018 वार - बुधवा

विशेष माहिती दि. 25/07/2018 वार - बुधवा




       सोमनाथ चॅटर्जी 


सोमनाथ चॅटर्जी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी नेते आहेत. ते १४ व्या लोकसभेचे सभापती होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल  राज्यातील  बरद्वान मतदारसंघातून आणि इ.स. १९७७ आणि इ.स. १९८० च्या लोकसभा निवडणुकांत पश्चिम बंगाल  राज्यातील  जादवपूर मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते.
इ.स. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा काँग्रेस पक्षाच्या उमेदवार ममता बॅनर्जी यांनी जादवपूर लोकसभा मतदारसंघात पराभव केला. त्यानंतर ते इ.स. १९८५ मध्ये पश्चिम बंगाल राज्यातील बोलपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. पुढे, इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी त्याच मतदारसंघातून विजय मिळवला.
अभ्यासू वृत्ती,आपला मुद्दा कौशल्याने मांडायची हातोटी आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व यामुळे त्यांनी लोकसभेच्या कामकाजावर आपला प्रभाव पाडला.. जुलै इ.स. २००८मध्ये मनमोहन सिंह सरकारवरील विश्वासदर्शक ठरावादरम्यान त्यांनी लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा न देता सभाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली. त्या कारणावरून त्यांचे कार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी मतभेद झाले आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी इ.स. २००९ ची लोकसभा निवडणुक न लढवता सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers