शास्त्रीय गायिका व पंडित कुमार गंधर्व यांच्या पत्नी मा.वसुंधरा कोमकली यांची पुण्यतिथी.*
ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका म्हणून मा. वसुंधरा कोमकली यांची ओळख होती.
१९४२
मध्ये त्यांनी आधी कलकत्ता आणि तिथून कुमार गंधर्व आणि प्रोफेसर बी. आर.
देवधर यांच्याकडून संगीताचे धडे गिरवण्यासाठी मुंबई गाठली. त्यानंतर कुमार
गंधर्व यांच्याशीच विवाह करून त्या देवास येथे स्थायिक झाल्या.
‘गीतवर्षां’, ‘त्रिवेणी’, ‘मला उमगलेले बालगंधर्व’, ‘तांबे गीतरजनी’
‘गीतहेमंत’, ‘ठुमरी, टप्पा, तराणा’ असे स्वतंत्र निर्मिती असलेले हे
मा.कुमार गंधर्व यांचे कार्यक्रम मा. वसुंधरा कोमकली यांच्या शिवाय होऊच
शकले नसते. कुमारजींच्या व्यक्तिगत जीवनात त्या अर्धागिनी तर होतीच पण
त्यांच्या सांगीतिक जीवनामध्येही त्या अविभाज्य अंग होत्या. भारत सरकारने
त्यांना पद्मश्रीने सन्मानित केले होते. तर नाटय़ अकादमी पुरस्कार आणि इतर
अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांच्याही त्या मानकरी ठरल्या होत्या. त्यांच्या
कन्या कलापिनी कोमकली या देखील प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आहेत. मा.वसुंधरा
कोमकली यांचे २९ जुलै २०१५ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे
मा.वसुंधरा कोमकली यांना आदरांजली
No comments:
Post a Comment