🌷🍃 विशेष माहिती 🌷🍃
=========ஜ۩۞۩ஜ=========
सर एडमंड हिलरी
सर एडमंड हिलरी हे शेर्पा तेनसिंग नोर्गेबरोबर सर्वप्रथम एव्हरेस्ट सर करणारे जगप्रसिद्ध गिर्यारोहक होते. त्यांनी २ मे १९५३ रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी ११.३० ला एव्हरेस्टचे ८८४८ मी. उंचीचे शिखर सर केले. ही कामगिरी त्यांनी एव्हरेस्टसाठीच्या नवव्या ब्रिटिश मोहिमेअंतर्गत केली.
एव्हरेस्ट आणि हिमालयीन साहसमोहिमांव्यतिरिक्त त्यांनी स्नो-कॅटरने दक्षिण ध्रुवावर यशस्वी मार्गक्रमण केले, उत्तर ध्रुव पादाक्रांत केला आणि जेट बोटीने बंगालच्या उपसागरातून गंगा नदीच्या प्रवाहातून तिच्या उगमापर्यंत जाण्याचा पराक्रम केला. त्यांनी हिमालयातील साहस मोहिमांबरोबर तेथील लोकांसाठी अनेक कल्यणकारी प्रकल्प हाती घेतले आहेत. एडमंड हिलरी हयांचे भारताशी आणि भारतीयांशी अतूट नातेदेखील जोडले आहे. त्यांनी काही काळ भारतात 'हायकमिशनर' ह्या पदावर काम केले आहे.
No comments:
Post a Comment