Definition List

LightBlog
Viral Gawali

Thursday, July 19, 2018

विशेष माहिती

विशेष माहिती



                   डॉ. जयंत विष्णू नारळीकर
डॉ. जयंत विष्णू नारळीकर हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक आहेत.
नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ,  वाराणसी  येथील  बनारस हिंदू विद्यापीठाच्यागणित शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली.
१९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली.
डॉ. नारळीकर यांच्या पत्‍नी मंगला नारळीकर ह्या ’नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे.


19 जुलै 1938 : डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म – खगोलशास्त्रज्ञ, 1964 मधे केम्ब्रिज विद्यापीठात गुरुत्वाकर्षणा संदर्भातील एक नवा सिद्धांत मांडला.

80व्या वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा..!!🎂🍰💐

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers