Definition List

LightBlog
Viral Gawali

Monday, July 30, 2018

मा.सुलोचना दीदींचा वाढदिवस


अभिनेत्री मा.सुलोचना दीदींचा वाढदिवस
जन्म. ३० जुलै १९२८

हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील श्रेष्ठ अभिनेत्री मा.सुलोचना यांचे पूर्ण नाव सुलोचना लाटकर.
मा.भालजी पेंढारकरांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. सन १९४३ ला त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात चरित्र अभिनेत्री/ घरंदाज आई म्हणून काम केले. मा.भालजी पेंढारकर यांच्या दिग्दर्शनाच्या तालमीत तयार झालेल्या सुलोचनाबाईंची प्रतिमा लाखो चित्रपट रसिकांच्या मनात चित्रपटातील आई अशीच आहे. सोज्वळ, शांत आणि घरंदाज भूमिका त्यांनी पडद्यावर जिवंत केल्या. शेकडो मराठी आणि अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी अशा भूमिका केल्या. त्यांनी अन्य भूमिकाही केल्या आहेत. १९४३ ला हिंदी चित्रपट सृष्टीत सहकलाकार म्हणून पृथ्वीराज कपूर यांच्या बरोबर अभिनयाची सुरुवात करून पुढे राजकपूर, शम्मीकपूर, शशीकपूर या कपूर घराण्याच्या दुसऱ्या पिढीबरोबर आणि नंतर, कपूर घराण्याच्या तिसऱ्या पिढीच्या रणधीर कपूर, ऋषी कपूर, गीता बाली, बबिता, नीतू सिंग यांच्या बरोबरही त्यांनी हिंदी चित्रपटातील काळ गाजवला. २५० हून अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटांत त्यांनी आपल्या अभियानाची छाप पाडली. वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, धाकटी जाऊ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. आपल्या समुहा तर्फे मा.सुलोचना दीदींनां वाढदिवसाच्या शुभेच्छा.
संजीव वेलणकर पुणे.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers