Definition List

LightBlog
Viral Gawali

Monday, July 30, 2018

मा.डॉ. अशोक रानडे यांची पुण्यतिथी.


                                    ज्येष्ठ संगीततज्ज्ञ आणि संगीतकार मा.डॉ. अशोक रानडे यांची पुण्यतिथी.



जन्म. २५ आक्टोबर १९३७
डॉ. रानडे यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण पं. गजाननराव जोशी, पं. लक्ष्मणराव बोडस आणि प्रा. बी. आर. देवधर यांच्याकडून घेतले. संगीतशास्त्राचे गाढे विद्वान, अशी ख्याती असलेल्या डॉ. रानडे यांनी भारतीय लोकसंगीत आणि पाश्चिीमात्य शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास केला होता. मुंबई विद्यापीठाच्या संगीत केंद्राचे पहिले संचालक असलेल्या डॉ. रानडे यांनी अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज आणि नॅशनल कौन्सिल फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌ या संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण पदे भूषविली होती. त्यांना फुलंब्रीकर पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. बडोदा येथील महाराज सयाजीराव विद्यापीठातील टागोर अध्यासनावर त्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांना १९९० मध्ये व्यावसायिक रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. डॉ. रानडे यांनी अनेक विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत आणि "व्हॉईस कल्चर'चे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले होते. त्यांचे "संगीताचे सौंदर्यशास्त्र', "लोकसंगीतशास्त्र' हे ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. संगीत क्षेत्रातील विविध प्रवाहांबाबत डॉ. रानडे यांनी सदोदित स्वागतशील भूमिका घेतली होती. त्यांना याच वर्षी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मा.डॉ. रानडे यांचे ३० जुलै २०११ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.डॉ. रानडे यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers