प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगमचा वाढदिवस.
जन्म ३० जुलै १९७३ फरीदाबाद, हरियाणा
येथे
सोनूने आपल्या करिअरची सुरुवात वयाच्या चौथ्या
वर्षापासून केल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. एका स्टेज शोवेळी सोनूने त्याचे
वडील अगम कुमार निगम यांच्यासह मोहम्मद रफी यांचे 'क्या
हुआ तेरा वादा' हे प्रसिद्ध गाणे गायले होते. त्यानंतर
वडिलांसह तो अनेक लग्न आणि पार्ट्यांमध्ये गाताना दिसला होता. वयाच्या १९ व्या
वर्षी बॉलिवूडमध्ये सिंगिंग करिअर सुरु करण्याच्या उद्देशाने सोनू मुंबईत आला.
सुरुवातीच्या काळात सोनूने मोहम्मद रफी यांची गाणी गायली. त्यामुळे त्याला 'रफी
क्लोन' या नावाने ओळखले जाऊ लागले होते. १९९० मध्ये 'जानम'
या सिनेमातीसाठी सोनूने पहिल्यांदा पार्श्वगायन केले होते, मात्र
ते गाणे रिलीज होऊ शकले नाही. १९९५ मध्ये त्याने 'सारेगामा'
हा सांगितिक रिअॅलिटी शो होस्ट केला. हा शो टीव्ही जगतातील प्रसिद्ध
शोपैकी एक आहे. याचवर्षी त्याने 'बेवफा सनम' या
सिनेमातील 'अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का' हे
गाणे गायले. त्याकाळी हे गाणे बरेच गाजले होते. त्यानंतर १९९७ मध्ये 'बॉर्डर'
सिनेमातील 'संदेसे आते है' या
गाण्याने सोनूला बरीच प्रसिद्ध मिळवून दिली. हे गाणे अनू मलिक यांनी कंपोज केले
होते. सोनून त्याच्या करिअरमध्ये आत्तापर्यंत अनेक गाणी गायली. याशिवाय 'दीवाना',
'याद', 'जान' आणि 'चंदा
की डोली' हे अल्बमसुद्धा तयार केले. सोनू निगमचे मराठी
चित्रपटसृष्टीशी असलेले नाते नवीन नाही. ‘हिरवा निसर्ग’ हे ‘नवरा माझा नवसाचा’
चित्रपटाचे गाणे व ‘टिक टिक वाजते’ हे ‘दुनियादारी’चे गाणे, ही
दोन्ही अतिशय लोकप्रिय गीते सोनू निगमने गायले आहे. सोनू निगमला दोन बहिणी आहेत.
निकिता आणि तीशा ही त्यांची नावे आहेत. सोनूच्या दोन्ही बहिणी पार्श्वगायिका
म्हणून करिअर करत आहेत. सोनूच्या पत्नीचे नाव मधुरिमा आहे सोनू निगमचा मुलगा
नवीनने २०११ मध्ये धनुषने गायलेले 'व्हाय धीस कोलावरी डी' या
गाण्याच्या चाइल्ड व्हर्जन गायले होते.
आपल्या समुहा तर्फे सोनू निगमला वाढदिवसाच्या
शुभेच्छा.
संजीव वेलणकर पुणे.
No comments:
Post a Comment