Definition List

LightBlog
Viral Gawali

Wednesday, July 25, 2018

लेखक मा.बी. आर. इशारा

आज २५ जुलै

आज ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक मा.बी. आर. इशारा यांची पुण्यतिथी.
जन्म. ७ सप्टेंबर १९३४.
हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी मा.बी. आर.इशारा १९६० च्या दशकात मुंबईत आले. हिंदी चित्रपटांत नवीन ज्वलंत विषयांची लाट आणण्याचे काम मा.बी. आर. इशारा यांनी १९७० च्या दशकात केले. "इन्साफ‘ या चित्रपटाच्या लेखनापासून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी १९६९ ते १९९६ या काळात ३४ चित्रपट बनवले. मा.बी. आर.इशारा यांनी चित्रपटसृष्टीत "बोल्ड‘ विषय आणले. कोणीही हाताळले नाहीत, अशा विषयांवर त्यांनी चित्रपट तयार केले. "चेतना‘मध्ये त्यांनी वेश्यां च्या पुनर्वसनासारखा विषय घेतला. हा चित्रपट २५ दिवसांत पूर्ण झाला होता. बंगल्यात चित्रीकरण करण्याचा पायंडा त्यांनी पाडला. त्यांनी "प्रेम शस्त्र‘, "औरत और इंतकाम‘, "वो फिर आयेगी‘, "हम दो हमारे दो‘, "जरूरत‘, "मिलाप‘ आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना हिंदी चित्रपटसृष्टीचे दार उघडून दिले. त्यामध्ये परवीन बाबीचा समावेश होता. अमिताभ बच्चन, जया भादुरी, शत्रुघ्न सिन्हा, डॅनी, रेहाना सुलतान, विजय अरोरा, रीना रॉय, रझा मुराद आदी अभिनेत्यांसह क्रिकेटपटू सलीम दुराणी यांच्यासह इशारा यांनी काम केले. चित्रपटांचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन अशा तिन्ही जबाबदाऱ्या त्यांनी कौशल्याने पार पाडल्या. ज्येष्ठ कलाकार रेहाना सुलतान ह्या बी. आर. इशारा यांच्या पत्नी होत. मा.बी.आर.इशारा यांचे २५ जुलै २०१२ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.बी.आर.इशारा यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers