फिजिक्स ऑलिंपियाड: भारताकडून सुवर्ण पदकांची लयलुट!
आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिंपियाड
२०१८मध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी नवा इतिहास रचला. स्पर्धेत सहभागी झालेल्या
देशाच्या संघातील सर्व ५ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके जिंकण्याची गेल्या २१
वर्षातील ही पहिलीच घटना आहे. भारताचे हे स्पर्धेतील आजवरचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन
आहे.
स्पर्धेत भारताकडून भास्कर गुप्ता (मुंबई),
लय जैन (कोटा), निशांत अभांगी (राजकोट), पवन
गोयल (जयपूर) आणि सिद्धार्थ तिवारी (कोलकाता) यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
स्पर्धेत जगभरातील ३९६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ४२ जणांना
सुवर्णपदक जिंकता आले.
No comments:
Post a Comment