प्रसिद्ध गीतकार मा.आनंद बक्षी यांचा जयंती.
जन्म. २१ जुलै १९३०मा.आनंद बक्षी, हे
अभ्यासू, परिश्रम घेणारे गीतकार ओळखले जात होते.
भगवानदादांची भूमिका असलेला ‘भला आदमी’ हा
चित्रपटापासून त्यांनी गीते लिहण्यास सुरवात केली. हा चित्रपट १९५८ मध्ये
प्रदर्शित झाला मात्र त्यापूर्वीच ‘शेर-ए-बगदाद आणि ‘सिल्व्हर किंग’ हे त्यांचे
चित्रपट झळकले. शैलेंद्रसारख्या दिग्गज गीतकाराने अनेक निर्मात्यांकडे बक्षी
यांच्यासाठी शब्द टाकला तर साहिरसारख्या प्रतिभावंताने बक्षींना वेळोवेळी
मार्गदर्शन केले. ‘पारसमणी’ आणि ‘दोस्ती’च्या गाण्यांनी चित्रपटसृष्टीत खळबळ उडवणाऱ्या
लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीसह ‘मि. एक्स इन बॉम्बे’ या चित्रपटासाठी गीते
लिहिण्याची संधी आनंद बक्षी यांना मिळाली. यातील ‘मेरे मेहबूब कयामत होगी’ आणि
‘खूबसूरत हसीना’ ही गाणी लोकप्रिय झाली. यानंतर ‘हिमालय की गोद में’ आणि ‘जब जब
फूल खिले’ या कल्याणजी-आनंदजी यांनी स्वरबद्ध केलेल्या चित्रपटांतील बक्षींनी
लिहिलेली गाणी कमालीची गाजली. आशयगर्भ, हलकीफुलकी शब्दकळा, प्रेमगीत,
विरहगीत, भजन, कव्वाली, थीम
साँग, क्लब डान्स.. सर्व प्रकारची गाणी झटपट लिहून
देणारा गीतकार म्हणजे आनंद बक्षी असे समीकरण रूढ झाले!लक्ष्मी-प्यारे यांच्यासोबत त्यांची भट्टी
जमली. या जोडीने ‘मिलन, आसरा, लुटेरा, आए
दिन बहार के, फर्ज, तकदीर, अंजाना,
आया सावन झुम के, जीने की राह, जिगरी
दोस्त’ असे एकापेक्षा एक सुरेल चित्रपट देऊन ६० च्या दशकाची अखेर गाजवली. १९६९
मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आराधना’ने घडवलेला इतिहास सर्वज्ञात आहे. प्रतिभावान
कवी-गीतकाराची सारी वैशिष्टय़े ‘अमर प्रेम’मधील ‘चिंगारी कोई भडके’, ‘कूछ
तो लोग कहेंगे’, ‘ये क्या हुआ’, ‘रैना
बिती जाए’, ‘बडा नटखट है रे’, ‘डोली
मे बिठाके’ या गाण्यांमध्ये होती. लक्ष्मी-प्यारेसोबत त्यांनी ३०२ तर पंचमसोबत ९९
चित्रपट केले. राज कपूर, शक्ति सामंता, मनमोहन
देसाई, यश चोप्रा, राज
खोसला, सुभाष घई या आघाडीच्या निर्माता-दिग्दर्शकांनी
बक्षींकडून शेकडो गाणी लिहून घेतली यातच सारे आले. आर.के ने ‘बॉबी’च्या
गाण्यांसाठी स्वत: बक्षी यांच्या घरी जाऊन त्यांना करारबद्ध केले. १९७०चे दशकही
बक्षींचेच होते. ‘आन मिलो सजना, गीत, हमजोली,
कटी पतंग, खिलौना, द
ट्रेन, दुश्मन, हरे
राम हरे कृष्ण, हाथी मेरे साथी, अपना
देश, नमक हराम, शोले,
ज्यूली, सरगम’ ‘कर्ज, एक
दुजे के लिये, हीरो, आशा, रॉकी,
बेताब, लव्ह स्टोरी, अलग
अलग..’ या चित्रपटांद्वारे १९८०च्या दशकातही बक्षी आघाडीवर राहिले. तरुण पिढी ला
आवडणारी ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’,
‘दिल तो पागल है’, ‘ताल’, ‘मोहब्बते’,
‘गदर’ या चित्रपटांतील गाणी
मा.आनंद बक्षी यांनी लिहलेली आहेत. नवीन पिढीतील संगीतकारांशीही त्यांचे सूर जुळले
होते आनंद बक्षी यांनी साडेतीन हजार च्या वर गाणी लिहली. गीतकारासाठीचा फिल्मफेअर
पुरस्कार त्यांनी पाच वेळा पटकावला तर याच पुरस्कारासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल ४०
नामांकने त्यांना लाभली. मा.आनंद बक्षी यांचे ३० मार्च २००२ रोजी निधन झाले.
आपल्या समुहा तर्फे मा.आनंद बक्षी यांना आदरांजली.
No comments:
Post a Comment